जयललितांचा मृतदेह बाहेर का काढला जाऊ नये ?, मद्रास हायकोर्टाचा सवाल

 जयललितांचा मृतदेह बाहेर का काढला जाऊ नये ?, मद्रास हायकोर्टाचा सवाल

  • Share this:

jayalalita29 डिसेंबर : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा मृत्यू नेमका कशामुळे ओढवला, याबद्दल संशय घेतला जातोय. त्यावर, जयललितांचा मृतदेह बाहेर का काढला जाऊ नये, असा सवाल कोर्टाने विचारलाय.

जयललितांच्या मृत्यूबद्दल माध्यमांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. जयललितांचं ५ डिसेंबरला चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्याआधी ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ त्यांच्यावर याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल फारच कमी माहिती प्रसारमाध्यमांमध्ये येत होती.

जयललितांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका कोर्टात दाखल झाली. या सुनावणीच्या वेळी कोर्टाने जयललितांचा मृतदेह बाहेर काढण्याबद्दल सवाल विचारलाय.

जयललिता या हॉस्पिटलमध्ये असताना आहार घेत होत्या, पेपर्सवर सह्या करत होत्या आणि बैठकाही घेत होत्या. मग अचानक त्यांचा मृत्यू कसा ओढवला, जयललितांच्या मृत्यूबद्दलचं सत्य बाहेर आलं पाहिजे, असं कोर्टाने म्हटलंय.

जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन याच त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होत्या. जयललितांच्या मृत्यूनंतर आता शशिकला नटराजन यांची अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी निवड झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 29, 2016, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading