नोटबंदीवर कर सवलतींची मलमपट्टी ?

नोटबंदीवर कर सवलतींची मलमपट्टी ?

  • Share this:

arun jaitley and narendra modi

27 डिसेंबर : नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली नकारात्मकता झटकण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हे कररचनेत आमुलाग्र बदल करण्याची शक्यता आहेत. तसे संकेत त्यांनी काल एका कार्यक्रमात दिले आहे.

कराचे दर कमी करून त्यात जास्तीत जास्त करदात्यांना आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत जेटलींनी व्यक्तत केलं. म्हणजे कमी करदाते आणि जास्त कर असं जे आतापर्यंतचं समीकरण आहे ते बदलून जास्त करदाते आणि कमी कर असं होण्याची शक्यता जेटलींनी व्यक्त केलीय. आगामी अर्थसंकल्प त्या दृष्टीनं ऐतिहासिक ठरणार आहे.

सध्यस्थितीत एकूण लोकसंख्येच्या फक्त 1 टक्का लोक कर भरतात. आपल्या देशात टॅक्सचं प्रमाण अधिक असल्यामुळे लोक टॅक्स चोरी करतात. त्याला आळा बसावा आणि प्रत्येकाला टॅक्स भरावासा वाटला पाहिजे अशी आशाही जेटलींनी व्यक्त केलीय.

दरम्यान, नोटाबंदीचे 50 दिवस उद्या संपणार आहे आणि त्यापार्श्वभूमीवर सरकार रोज नव्या योजना लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतंय. पाहुयात त्या काय आहेत

लोकांना कर भरावा असं वाटण्यासाठी

कराचे दर कमी करण्याचे संकेत

कर आकारणीच्या स्लॅबमध्ये बदल

करून नोकरदार वर्गाला खूश केलं जाऊ शकतं

उद्योगांना चालना देण्यासाठी कार्पोरेट

करात बदल करण्याची शक्यता व्यक्त

उत्तर प्रदेश निवडणुकीत फटका बसू

द्यायचा नसेल तर करांचा विचार करावाच लागेल

3 टक्के व्याजदर सवलतीचा लाभ

घेणाऱ्या शेतकऱ्यांना 60 दिवसांची

अतिरिक्त कर्ज परतफेड करण्यास

सध्या सरकारची परवानगी

30 डिसेंबरच्यानंतर जुन्या नोटा

बाळगल्या तर दंड आकारण्याची शक्यता

बेनामी संपत्तीवर टाच आणण्याचे

पंतप्रधानांचे मन की बातमध्ये संकेत

कर शक्यता, नोटाबंदीनं निर्माण

झालेल्या अस्थिरतेनं शेअर बाजाराची गाळण

30 डिसेंबरनंतरही नोटातंगी कायम

राहण्याची शक्यता, एसबीआयचे संकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 27, 2016, 5:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading