2 कोटींची उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना डिजिटल व्यवहारांवर सूट - जेटली

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2016 05:08 PM IST

arun_jaitly_new

20 डिसेंबर :  2 कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना डिजीटल व्यवहारामध्ये काही प्रमाणात सवलत देण्यात येणार असून कॅशलेस व्यवहारांवर 2 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जेटली बोलत होते.

रिझर्व्ह बँकेकडे आवश्यक तेवढे चलन आहे. मात्र, सध्या छपाई केलेल्या सगळ्या नोटा चलनात नाहीत. आवश्यकतेनुसार चलनपुरवठा करण्यात येत आहे. तसंच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यासाठी आणखीन नवे पर्याय देण्यात येत आहेत, असं जेटली म्हणाले. तसंच, गेल्या 40 दिवसांत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचंही त्यांनी सांगितलं .

दरम्यान, नोटबंदी निर्णय जाहीर करून आता 42वा दिवस झाले आहेत. आत्तापर्यंत 15 लाख 44 हजार कोटींच्या नोटा बंद झाल्या असून याबाबतचे अधिकृत आकडे 30 डिसेंबरनंतर येतील असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2016 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...