आता 5 हजारांपर्यंतच्या जुन्या नोटा बँकेत भरण्यावरही निर्बंध

आता 5 हजारांपर्यंतच्या जुन्या नोटा बँकेत भरण्यावरही निर्बंध

  • Share this:

Note Currency123

19 डिसेंबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील काळा पैसा हद्दपार करण्यासाठी चलनातून रद्द केलेल्या 500 आणि च्या नोटा बँकेत भरण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीला काही दिवस शिल्लक असतानाच केंद्र सरकारने आता नवीन घोषणा केली आहे. त्यानुसार आता केवळ एकदाच 5 हजारांच्या जुन्या नोटा 31 डिसेंबरपर्यंत बँकेत भरता येणार आहेत. 5 हजारांपेक्षा जास्त रक्कमेच्या जुन्या नोटा आता बँकेत भरता येणार नाहीत.

जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत संपण्यासाठी आता केवळ 12  दिवस उरले आहेत. या 12 दिवसांत वेगवेगळ्या मार्गानं मोठ्या प्रमाणावर काळा पैसा बँकेत जमा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला चाप बसावा म्हणून सरकारनं ही नवी शक्कल लढवली आहे. 30 तारखेपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरूपात 5 हजारांहून अधिक रक्कम फक्त एकदाच बँक खात्यावर जमा करता येईल. पण 5 हजारांहून अधिक रक्कम जमा करणाऱ्यांना काही प्रश्नांना सामोरं जावं लागेल.  काही लोक आपल्या चालू खात्यांवरुन काळा पैसा पांढरा करत असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 19, 2016, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading