लष्करप्रमुख नियुक्तीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना का डावललं? विरोधकांचा सवाल

लष्करप्रमुख नियुक्तीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना का डावललं? विरोधकांचा सवाल

  • Share this:

Bipin rawat123

18 डिसेंबर :  सेवाज्येष्ठतेचा निकष डावलून भारताच्या लष्करप्रमुखपदी अनपेक्षितपणे झालेल्या लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांच्या नियुक्तीवरून राजकीय वाद सुरू झाला आहे. तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून सरकारनं रावत यांचीच निवड का केली,' असा सवाल काँग्रेसनं केला आहे. संयुक्त जनता दलानंही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

 भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून मोदी सरकारनं लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांच्या नावाची घोषणा केली आहे. येत्या 31 डिसेंबरला ते पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. सेवाज्येष्ठतेच्या निकषावर रावत हे चौथ्या क्रमांकावर असतानाही त्यांची लष्करप्रमुखपदी वर्णी लागली आहे. त्यामुळं साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेससह विरोधी पक्षांनी लगेचच सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'रावत यांच्या क्षमतेवर आम्हाला अजिबात शंका नाही. मात्र, त्यांना बढती देताना इतर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नजरेआड का केलं गेलं? याचा खुलासा सरकारनं करायला हवा,' असं काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटलं आहे.

 लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी मात्र सरकारची पाठराखण केली आहे. 'लष्कराला वादात ओढणं अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संरक्षण तज्ज्ञ आणि सेवानिवृत्त कर्नल अनिल कौल यांनी रावत यांची नियुक्ती योग्यच असल्याचं म्हटलं आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही या निर्णयाला पाठींबा दिला आहे. सैन्यदल प्रमुखासारख्या पोस्टवर कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या नेमणुकीवरून राजकारण करणं चुकीचं. त्यामुळे सैन्याचं मनोबल खच्ची होतं. सरकारने लष्करप्रमुख बदलण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 18, 2016, 4:00 PM IST

ताज्या बातम्या