मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे - राहुल गांधी

मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे - राहुल गांधी

  • Share this:

rahul gandhiaw

14 डिसेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत,' असा गौप्यस्फोट करत, 'मोदींच्या भ्रष्टाचारावर मला लोकसभेत बोलायचं आहे. पण बोलूच दिलं जात नाही,' असा गंभीर आरोप करत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहेत.

संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी हा आरोप केला. 'पंतप्रधान मोदी स्वत: घोटाळ्यात सहभागी आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडं आहेत. पण मला बोलू दिलं जात नाही. मी बोलले तर त्यांचा फुगा फुटेल हे त्यांना कळून चुकलं आहे. ते घाबरलेत म्हणून ते संसदेत येत नाहीत,' असा दावाही राहुल गांधी यांनी केला. नोटांबदीबद्दल पंतप्रधानांनी देशाला उत्तर दिलं पाहिजे. ते जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाहीत,' असंही राहुल गांधी म्हणाले.

विरोधकांकडून कामकाज रोखण्यात येत असल्याचे अनेकदा घडले आहे. मात्र, आता पहिल्यांदाच सरकारकडून कामकाज रोखण्यात येत असल्याची टीका राहुल गांधीनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 14, 2016, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading