शिर्डीत आजपासून टाईम दर्शनाची सुविधा, दर्शनासाठी वेळेचं बंधन

शिर्डीत आजपासून टाईम दर्शनाची सुविधा, दर्शनासाठी वेळेचं बंधन

  • Share this:

sai baba

12 डिसेंबर : शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आता तुम्हाला वेळेचं बंधन असणार आहे. कारण आजपासून शिर्डीमध्ये टाईम दर्शन सुविधा सुरू होणारे. ज्यामध्ये नोंदणी केल्यानंतरच आता भक्तांना साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे.  या सुविधेचं उद्घाटन शिर्डी साई संस्थांनचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले.

नोंदणी करण्यासाठी संस्थानाच्या परिसरात 10 काउंटर्स उघडण्यात आले आहेत. नोंदणी केल्यानंतर संस्थानातर्फे एक कार्ड देण्यात येईल ज्यावर तुम्ही कधी दर्शन करू शकता याची वेळ दिलेली असेल.

दर्शनासाठीही आता फक्त 15 मिनिटांचाच अवधी असेल.  यामुळे सामान्य दर्शन बारी बंद होणार असून बायोमेट्रिक पद्धतीने दिलेल्या पासद्वारेच भाविकांना दर्शन घ्यावे लागेल.  तर या अंमलबजावणीसोबतच समाधीला लावण्यात आलेल्या काचाही काढण्यात येणार आहेत. ज्यामुळे भाविक आता समाधीला स्पर्श करून दर्शनाचा आनंद घेऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 12, 2016, 3:58 PM IST

ताज्या बातम्या