... म्हणून मी जनतेसमोर येऊन बोलत आहे - मोदी

... म्हणून मी जनतेसमोर येऊन बोलत आहे - मोदी

  • Share this:

Narenddra modi12

09 डिसेंबर :  नोटाबंदीवर मी संसदेत बोललो तर भूकंप होईल असा इशारा देणाऱ्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नाहीत. खोटारडेपणा अधिक काळ ठिकत नसल्याने ते पळ काढत आहेत, असा हल्ला चढवतानाच नोटाबंदीवर चर्चा करायला आम्ही तयार आहोत. पण मलाच लोकसभेत बोलू दिले जात नसल्याने मी जनसभेत बोलण्याचा निर्णय घेतला असल्याचा पलटवार मोदी यांनी विरोधकांवर केला.

गुजरातमधील दिसा इथं झालेल्या सभेत या विषयावर मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. आपल्या राष्ट्रपतींना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. संसदेचं कामकाज होत नसल्याने ते नाराज आहेत. त्यांनी विरोधकांच्या या वागण्यावर आक्षेप नोंदवल्यानंतरही विरोधक संसदेचे कामकाज सुरळीत होऊ देत नाहीत,अशी टीका मोदी यांनी केली.

मतदान वाढवण्यासाठी आपण जसा प्रयत्न करतो, तसा प्रयत्न लोकांना बँकींग शिकवण्यासाठी करावा, असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. राजकारणापेक्षा देशहित केंव्हाही महत्वाचे आहे, असं सांगतानाच 50 दिवसानंतर परिस्थिती हळूहळू निवळेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 10, 2016, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading