'कॅशलेस'वर काय स्वस्त मिळणार ?

'कॅशलेस'वर काय स्वस्त मिळणार ?

  • Share this:

cash_less08 डिसेंबर : कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सवलतींचा वर्षाव सुरू केलाय. कॅशलेस व्यवहार करणाऱ्या नागरिकांना खरेदीवर अर्ध्या टक्क्यापासून 10 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आलीये. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घोषणा केल्या.

मुंबईत लोकलचा पास स्वाईप किंवा ऑनलाईन व्यवहारांद्वारे काढणा-यांना प्रवाशांना अर्धा टक्के सवलत मिळणार आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदी स्वाईप करुन केल्यास पाऊण टक्के सवलत मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर स्वाईप करुन टोल भरल्यास दहा टक्के सवलत मिळणार आहे. तर विम्याचा हप्ता ऑनलाईन भरल्यास आठ टक्के सवलत राहणार आहे. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारनं या उपाययोजना केल्यात. चलनतुटवड्यावर उपाय म्हणूनही या उपाययोजनांकडे पाहिलं जातंय.

हे मिळणार स्वस्त

- मुंबईत पेट्रोल 54 पैशांनी स्वस्त मिळणार

- मुंबईत डिझेल 45 पैशांनी स्वस्त मिळणार

- हॉटेलमध्ये 2 हजार रुपयांपर्यंतच्या खाण्यावर सेवाकर नाही

- लोकलच्या महिन्याच्या 500 रुपयांच्या पासवर 2.50 रुपयांची सूट

- 1 लाखांच्या आयुर्विम्याच्या हप्त्यावर 8 हजारांची सूट

- 1 लाखांच्या जनरल इन्शुरन्सच्या हप्त्यावर 10 हजारांची सूट

 

- 100 रुपयांच्या टोलवर 10 रुपयांची सूट

सूट आणि सवलती

1. पेट्रोल, डिझेलच्या डिजिटल खरेदीवर 0.75% सूट

2. जनरल इन्शुरन्सच्या ई-पेमेंटवर 10% सूट

3. आरोग्य विम्याच्या ई-पेमेंटवर 8% सूट

4. लोकल पासच्या डिजिटल पेमेंटवर 0.5% सूट

5. ऑनलाईन रेल्वे तिकिट काढल्यास कॅटरिंगवर 5% सूट

6. ऑनलाईन रेल्वे तिकिटावर 10 लाखांचा अपघाती विमा मोफत

7. राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलनाक्यांवर कॅशलेस पेमेंटवर 10% सूट

8. किसान कार्डधारकांना 'रुपे' कार्ड देणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 8, 2016, 9:26 PM IST

ताज्या बातम्या