S M L

महिना उलटला तरीही एटीम आणि बँकांबाहेर रांगा कायम

Samruddha Bhambure | Updated On: Dec 8, 2016 12:17 PM IST

atm_no_cash

08 डिसेंबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले, तरी त्याची अंमलबजावणी पूर्णपणे अपयशीच ठरली असल्याचे चित्र महिन्याभरानंतर दिसते आहे. आजही अनेक बॅंकांच्या शाखांपुढे, एटीएमपुढे रोकड घेण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. त्यातही रांगेतील प्रत्येकाला हवी असलेली रक्कम मिळेल, याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे आता नोटबंदीचे परिणाम आणि निर्णयाच्या यशा-अपयशाविषयी चर्चांना उधाण आलं आहे.

काळा पैशाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला संध्याकाळी 8 वाजता देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. तर 500 आणि हजाराच्या नोटांऐवजी 2000 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणण्याचे नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. याशिवाय चलनातून बाद झालेल्या नोटा बँकेत जामा करून त्याबदल्यात नवी नोटा घेण्याचं आवाहन देखील मोदींनी केलं होतं. बँकांतून आणि एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर काही निर्बंध घातले होते.


काळा पैशाला आळा घालण्यात जरी थोडं यश आलं असलं, तरी बँकांकडे अजून हवी तेवढी कॅश नाही. त्यात एटीएममधूनही बहुतांश वेळा दोन हजार रुपयांची नोट येत असल्याने राज्यापासून देशभरात सर्वत्र सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना त्यांचा पगार काढण्यासाठीही तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. अनेक बँकांमध्ये रोकड कमी असल्याने सरकाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षाही कमी रक्कम ग्राहकांच्या हातात पडत आहे.

नोटाबंदीमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन 50 दिवस कळ काढा, असं आवाहन पंतप्रधानांनी देशभरातील नागरिकांना केलं होतं. आता सरकारकडे केवळ 22 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे काळा पैसाबहेर काढण्यासाठी सरकारसा कितपत यश मिळेल याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2016 09:29 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close