S M L

अम्मांच्या पक्षाचं पुढे काय ?

Sachin Salve | Updated On: Dec 6, 2016 03:55 PM IST

अम्मांच्या पक्षाचं पुढे काय ?

06 डिसेंबर : तामिळनाडूमध्ये जयललितांचं निधन झालंय, नव्या मुख्यमंत्र्यांनी पदभारही स्वीकारलाय पण ज्या नेत्यांवर लोक एवढं प्रेम करत असतील, तिच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी सत्तेची नवी संधी निर्माण करणारी असेल.  जयललितांच्या जाण्यानं  पन्नीरसेल्वम यांच्यापुढे पक्षएकजूट ठेवणे हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

जयललितांच्या गैरहजेरीत पन्नीसेल्वम यांनी दोन वेळा मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहिला. आता अम्मांच्या निधनानंतर त्यांच्याकडे आता अधिकृतरित्या मुख्यमंत्रिपदी आले आहेत. पण, जयललिता यांनी पक्षात आपल्यापेक्षा असा कोणताही मोठा नेता होऊ दिला नाही. त्यामुळे पन्नीसेल्वम यांच्यापुढे पक्षाला एकजूट ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. जयललितांच्या सानिध्यात त्यांनी आपली अशी खास जागाही तयार केली नाही. भविष्यात जर पन्नीसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदावरुन कुणी खेचण्याचा प्रयत्न केला तर हीच त्यांची सर्वाच मोठी कमजोरी असणार आहे.

तामिळनाडूमध्ये दुसरा मोठा पक्ष आहे डीएमकेच्या करुणानिधी यांचा. पण करुणानिधी यांचं वय झाल्यामुळे ते राजकारणात उतरणार नाही. त्यांचा मुलगा स्टॅलिन आणि मुलीला त्यांचा जनधार घेऊन नशिब आजमावून पाहण्याची संधी आहे. पण जयललिता असं काही करू शकल्या नाही. त्यामुळे जयललितांच्या पक्षाला फुटीचा धोका आहे.


जयललिता यांचा जनाधारा मोठा आहे. देशभरात त्यांची प्रतिमा उंचावलीये. पण पक्षातला असा एकही नेता नाही जो त्यांची उंची गाठू शकेल. ज्या प्रकारे एमजी रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर पक्षनेतृत्वाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यावेळी रामचंद्रन यांची पत्नी जानकी रामचंद्रन आणि जयललिता यांच्यामध्ये उत्तराधिकारीसाठी मोठा संघर्ष झाला. पण निवडणुकीत जानकी यांच्या पराभवानंतर जयललिता निर्विवादपणे पुढे आल्या आणि पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्या बनल्या.

खऱंतर ज्याप्रकारे उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये जनता परिवारवाद असो किंवा कोणताही राडा पण तरीही जनता मुलायम सिंह, मायावती आणि लालूप्रसाद यादव यांनाच पसंती देते. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील जनताही अभिनेत्यांची देवासारखी पूजा करता. नेता मग किती भ्रष्ट असो जनता प्रेमापोटी त्यालाच निवडणूक देता. त्यामुळे आतापर्यंत नेहमी सत्तांतर होते आले आणि द्रमुक आणि अण्णाद्रमुक आळीपाळीने सत्तेवर विराजमान झाले. जनतेच्या याच मानसिकतेमुळे एमजी रामचंद्रन, जयललिता आणि एनटी रामराव यांचा बोलाबाला राहिला. एवढंच नाहीतर द्रविड मुनेत्र कजगमचे नेते आणि पाच वेळी मुख्यमंत्री राहिलेले एम.करुणानिधी हे तमिळ सिनेमा आणि तमिळ साहित्यात नावाजलेले नाव राहिले. असाच वल्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडे आहे. त्यांचा एखादा फ्लाॅप सिनेमा इतकी कमाई करतो की बाॅलिवडूचा हीट सिनेमाही करत नाही.

रजनीकांत यांना आता राजकारणात उतरण्याची संधी खुणावत आहे. भाजप आणि रजनीकांत यांची जवळकी पाहता तसे संकेतच मिळत आहे. पण, भाजपचा दक्षिण भारतात दबदबा नाही. त्यांचा कोणताही मोठा नेता नाही. त्यामुळे धोकाही तितकाच आहे.

Loading...

तर  शशीकला ह्या जयललितांच्या शेवटपर्यंत सावलीसारख्या सोबत राहिल्या. असं सांगतात की, शशीकला जेवढ्या जयललितांच्या जवळ जाऊ शकल्या तेवढं दुसरं कुणीच जाऊ शकलं नाही. त्यामुळे जयललितांच्या निधनानंतर शशीकला ह्याच एडीआयएमकेची सुत्रं सांभाळतील अशी शक्यता आहे.

पण शशीकलांना पक्षात फार मान्यता नसल्याचंही सांगितलं जातंय. कारण, जयललिता असताना शशीकला ह्या सरकारमध्ये अधिका•-यांच्या बदल्यांपासून ते नियुक्तीपर्यंत सगळं बघायच्या आणि नेत्यांना मात्र किंमत द्यायच्या नाहीत. एवढंच नाही तर जयललितांसारखं करीश्माई नेतृत्वगुणही शशीकलांकडे नसल्याचं सांगितलं जातंय. पण ह्या स्थितीत मग मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्याकडे सरकार आणि मग पडद्यामागून पक्षातले निर्णय शशीकला घेतील अशीही शक्यता वर्तवली जातेय. पण आता तमिळ जनतेला अम्मांची सवय असल्यामुळे पनीसेल्वम यांना आपलं नेतृत्व म्हणून स्वीकार करत का हा खरा प्रश्न आहे.

राजकीय चित्रं बदलणार?

..................

जयललिता यांच्यानंतर एआयएडीएमके पक्ष

म्हणून फुटणार की एक रहाणार?

मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यासमोर पक्ष

एकजुट ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान

जयललितांचे लोकसभेत 39 तर राज्यसभेत

18 खासदार, पनीरसेल्वम एकत्र ठेवू शकतील?

अभिनेते रजनीकांत यांना तामिळनाडू

राजकारणात उतरण्याची ही योग्य वेळ?

भाजपा रजनीकांत यांना खेचून तामिळनाडूत

स्वत:चं स्थान बनवणार?

तामिळनाडूसाठी काँग्रेस-भाजपात रस्सीखेच होणार?

करूणानिधीही आता थकलेत त्यामुळे

तामिळनाडूत आता नवं राज्य, नवे खेळाडू?

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2016 03:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close