S M L

जयललिता यांच्यानंतर कोण ?

Sachin Salve | Updated On: Dec 6, 2016 02:10 PM IST

जयललिता यांच्यानंतर कोण ?

06 डिसेंबर : जयललितांनंतर कोण? ह्या राजकीय प्रश्नाचं उत्तर आता शोधायला सुरुवात झालीय आणि जे वेगानं नाव समोर येतंय ते आहे शशीकला.

शशीकला ह्या जयललितांच्या शेवटपर्यंत सावलीसारख्या सोबत राहील्या. असं सांगतात की शशीकला जेवढ्या जयललितांच्या जवळ जाऊ शकल्या तेवढं दुसरं कुणीच जाऊ शकलं नाही. त्यामुळे जयललितांच्या निधनानंतर शशीकला ह्याच एडीआयएमकेची सुत्रं सांभाळतील अशी शक्यता आहे.

पण शशीकलांना पक्षात फार मान्यता नसल्याचंही सांगितलं जातंय. कारण जयललिता असताना शशीकला ह्या सरकारमध्ये अधिका•यांच्या बदल्यांपासून ते नियुक्तीपर्यंत सगळं बघायच्या आणि नेत्यांना मात्र किंमत द्यायच्या नाहीत. एवढंच नाही तर जयललितांसारखे करीश्माई नेतृत्वगुणही शशीकलांकडे नसल्याचं सांगितलं जातंय. पण ह्या स्थितीत मग मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्याकडे सरकार आणि मग पडद्यामागून पक्षातले निर्णय शशीकला घेतील अशीही शक्यता वर्तवली जातेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2016 02:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close