जयललितांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची श्रद्धांजली

जयललितांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची श्रद्धांजली

  • Share this:

jailalita image06 डिसेंबर -  तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे तामिळनाडू शोकसागरात बुडालाय. आपल्या या लाडक्या नेत्या अम्माला निरोप देण्यासाठी चेन्नईत चाहत्यांनी अलोट गर्दी केलीये. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय. अनेक मान्यवरांनी टि्वटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

प्रणव मुखर्जी

"तामिळनाडू राज्याच्या विकासासाठी जयललिता यांनी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही."

नरेंद्र मोदी

"उत्तम नेत्या, चांगल्या मित्र आणि आयर्न लेडी अशी ओळख असलेल्या जयललिता यांच्या निधनाबद्दल मी अतीव दुःख व्यक्त करतो. तुमची आठवण सदैव येत राहील. जयललिता यांचा जनसंपर्क, गरीबांच्या आणि महिलांच्या विकासासाठी असलेली तळमळ सदैव प्रेरित करत राहील."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"जयललिता यांच्यासारख्या काही मोजक्याचं लोकांना लोकांचं इतकं प्रेम आणि पाठिंबा अनुभवायला मिळतो जयललिता त्यांच्यापैकी एक होत्या आणि ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो तामिळनाडूच्या जनतेच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत."

राहुल गांधी

"आपण एका महान नेत्याला गमावलं आहे. महिला, शेतकरी, मच्छिमार लोक अशा सगळ्याच वंचितांनी जयललितांच्या डोळ्यांतूनच स्वप्नं बघितली."

अमिताभ बच्चन

"जयललिताजींच्या जाण्याचं मला अतीव दुःख झालंय..जयललिता एक स्ट्राँग वुमन"

राजनाथ सिंग

"जयललिता यांच्या निधनाची बातमी समजल्यावर आपल्याला अतीव दुःख झालं. गरीब आणि गांजलेल्या लोकांच्या त्या एक बुलंद आवाज होत्या..त्या कायम गरीब आणि गरजु लोकांच्या भल्यासाठी काम करत राहिल्या. तामिळनाडूच्या राजकारणावर त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं."

अमित शहा

"तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिताजी यांच्या जाण्याने आपल्याला अतीव दुःख झालंय. मी त्यांच्या पक्षकार्यकर्ते आणि समर्थकांच्या दुःखात माझीही सहवेदना व्यक्त करतो."

सुरेश प्रभू

"जयललिताजींच्या जाण्याने मला अतीव दुःख झालंय. त्यांच्या जाण्याबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली"

सानिया नेहवाल

"रेस्ट इन पीस जयललिता...अम्मा फॉर एव्हर..."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 6, 2016, 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading