S M L

अम्मांना अखेरचा निरोप, एमजीआर स्मारकाजवळ केलं दफन

Sachin Salve | Updated On: Dec 6, 2016 07:55 PM IST

अम्मांना अखेरचा निरोप, एमजीआर स्मारकाजवळ केलं दफन

†ÖêÃÖÃÖÖê Öê®ÖÖêêË copy

06 डिसेंबर -  तामिळनाडूच्या लाडक्या अम्मा आणि मुख्यमंत्री जयललितांना चेन्नईच्या मरिना बीचवर अखेरचा निरोप देण्यात आला. अण्णाद्रमुक पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांच्या स्मारकाशेजारीच त्यांच्या पाथिर्वाचं दफन करण्यात आलं.

जयललिता या मूळच्या अय्यंगार ब्राह्मण आहेत. या रितीरिवाजानुसार त्यांच्या पाथिर्वाला अग्नि देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हायला हवे होते. तरीही तामिळनाडू सरकार आणि अण्णाद्रुमक पक्षाच्या नेत्या शशिकला यांच्यासारख्या निकटवतिर्यांनी त्यांचं दफन करण्याचा निर्णय घेतला. जयललिता या आमच्यासाठी कोणत्याही धामिर्क आणि जातीय अस्मितेच्याही पलीकडच्या आहेत, असं अण्णाद्रमुकच्या एका नेत्याने सांगितलं.द्रविड चळवळीच्या सगळ्या दिग्गज नेत्यांचं याआधी दफनच करण्यात आलं होतं. पेरियार, अण्णा दुराई, एमजीआर या नेत्यांना याच पद्धतीने अखेरचा निरोप देण्यात आला होता. या नेत्यांची शवपेटी खास चंदनाच्या लाकडाची केली जाते आणि त्यावर सोन्याचं नक्षीकामही असतं. एमजीआर यांच्या स्मारकाजवळ जयललितांचं दफन करण्यात आलंय. आता इथे जयललिता यांचं स्मारक आकाराला येणार आहे.

Amma Funeral processionjpg

जयललितांच्या पाथिर्वाला अग्नि दिला नाही याचं आणखी एक कारण सांगितलं जातं. रितीरिवाजांनुसार रक्ताच्या नात्यातली व्यक्ती पाथिर्वाला अग्नि देऊ शकते. जयललिता यांच्या भावाची मुलगी दीपा जयकुमार ही त्यांची सख्खी नातलग आहे. पण जयललिता यांची अत्यंत जवळची मैत्रीण शशिकला याच अखेरपर्यंत त्यांच्यासोबत राहिल्या. त्यामुळे त्यांनी त्यांचं दफन करण्याचा निर्णय घेतला.

Loading...

याआधी, चेन्नईमधल्या राजाजी हॉलमध्ये जयललिता यांचं पाथिर्व अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी त्यांच्या पाथिर्वाचं अंत्यदर्शन घेतलं. जयललिता यांच्या पाथिर्वाशेजारी शशिकला आणि त्यांचे कुटुंबीय होते.

राजाजी हॉलमधून जयललिता यांचं पाथिर्व मरिना बीचवरच्या एमजीआर स्मारकाकडे नेण्यात आलं. आणि याच स्मारकाच्या शेजारी त्यांचा दफनविधी पार पडला. एमजीआर यांच्यानंतर चेन्नईमध्ये निघालेली ही पहिलीच मोठी अंत्ययात्रा होती. तामिळनाडूच्या जनतेने अतिशय भावविवश आणि शोकाकुल वातावरणात आपल्या लाडक्या अम्माला निरोप दिला.

=================================================================================================

जयललितांचा जीवन प्रवास

=================================================================================================

- अम्मांच्या अंत्यदर्शनासाठी चेन्नईच्या राजाजी हॉलबाहेर उसळला जनसागर

- साडे चार वाजता होणार अंत्यसंस्कार

m.ibnlokmat.tv/archives/239439

- जयललिता यांचं साम्राज्य पन्नीरसेल्वम सांभाळणार, मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

m.ibnlokmat.tv/archives/239433

- जयललितांचा राजकीय प्रवास

m.ibnlokmat.tv/archives/239295

- अभिनेत्री ते मुख्यमंत्री ‘अम्मा’ !

m.ibnlokmat.tv/archives/239299

- संसदेच्या दोन्ही सभागृहात अम्मांना आदरांजली

http://www.ibnlokmat.tv/

- तामिळनाडूतली अनेक शहरं बंद

m.ibnlokmat.tv/archives/239439

- अम्मांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

m.ibnlokmat.tv/archives/239453

- तामिळनाडू पोरकं झालं, अम्मा गेल्या

m.ibnlokmat.tv/archives/239429

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2016 06:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close