जयललिता यांचं साम्राज्य पन्नीरसेल्वम सांभाळणार, मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

जयललिता यांचं साम्राज्य पन्नीरसेल्वम सांभाळणार, मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

  • Share this:

Paneerselvam06 डिसेंबर - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन झालंय. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या जागी ओ. पन्नीरसेल्वम यांची निवड करण्यात आलीये. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी पन्नीरसेल्वम यांना मंत्रिपद आणि गोपीनियतेची शपथ दिलीये.

जयललिता यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचे विश्वासू सहकारी पन्नीरसेल्वम यांच्यावर याधीच मुख्यमंत्रिपदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली होती. रविवारी जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अण्णाद्रमुकच्या बैठकीत पन्नीरसेल्वम यांची गटनेतेपदी आणि मुख्यमंत्री निवड करण्यात आली. जयललिता यांच्या निधनानंतर एका छोटेखानी कार्यक्रमात पन्नीरसेल्वम यांचा शपथविधीही पार पडला.

ओ. पन्नीरसेल्वम यांचा राजकीय प्रवास

ओ. पन्नीरसेल्वम हे जयललितांचा उजवा हात मानले जातात.

2001- 2002 मध्ये जयललितांना निवडणूक लढवण्याची बंदी असताना पन्नीरसेल्वम हेच मुख्यमंत्री होते.

जयललितांच्या मंत्रिमंडळात पन्नीरसेल्वम यांनी महत्त्वाची पदं सांभाळली.

2014 – 2015 मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जयललितांना तुरुंगवास झाल्यावर पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री झाले.

2016 च्या निवडणुकांनंतर पन्नीरसेल्वम यांच्याकडे अर्थमंत्रिपद होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 6, 2016, 1:43 AM IST

ताज्या बातम्या