तामिळनाडूमध्ये कर्नाटकची बस फोडली, बससेवा बंद

तामिळनाडूमध्ये कर्नाटकची बस फोडली, बससेवा बंद

  • Share this:

bus attac

05 डिसेंबर : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयलिता यांचा प्रकृती खालवल्यामुळे समर्थकांनी अपोलो हाॅस्पिटलबाहेर एकच गर्दी केलीये. राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणू राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं तामिळनाडूमध्ये सुरक्षा वाढवलीय. मात्र, आज सकाळी कर्नाटकच्या परीवाहन बसवर तामिळनाडूतील तिरूवन्न-मालाई येथे दगडफेक करण्याची घटना घडलीये. त्यामुळे तामिळनाडूकडे जाणाऱ्या कर्नाटकच्या बस बंद करण्यात आल्या आहे.

खबरदारी म्हणून चैन्नई शहरात शीघ्र कृती दलाच्या 9 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या सर्व पोलिसांना सकाळी 7 वाजता ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव सोमवारी रात्रीच एका विशेष विमानानं चेन्नईत पोहचले. पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या ते संपर्कात आहेत. तामिळनाडूतल्या सर्व शाळा आणि कॉलेज आज बंद राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2016 10:18 AM IST

ताज्या बातम्या