LIVE: जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक, कार्यकर्त्यांचा संताप अनावर

LIVE: जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक, कार्यकर्त्यांचा संताप अनावर

  • Share this:

India Jayalalithaa

05 डिसेंबर- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं अपोलो रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या 70 दिवसांपासून तामिळनाडूतील अपोलो रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जयललिता यांच्या प्रकृतीबाबत सातत्यानं अफवा उठत आहेत. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या प्रकृतीविषयी काही प्रसारमाध्यमांनी चुकीचं वृत्त दिल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. मात्र त्यानंतर अपोलो रुग्णालयाने जयललिता यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलं आणि अफवांचा बाजार थंडावला.

काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यात आणखी भर पडली. अम्मांना सध्या हार्ट असिस्ट सिस्टम आणि इतर लाईफ सपोर्ट सिस्टम्सवर ठेवण्यात आलं आहेत. फुफ्फूस आणि हृदय जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा हार्ट असिस्ट डिव्हाईस मशीनच्या मदतीने रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. त्यापूर्वी काल रात्री त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं असून तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.  जयललिता यांच्यावर उपचार करण्यासाठी लंडनमधील ह्रदयरोगविषयक तज्ज्ञ डॉ. रिचर्ड बेले यांची मदत घेतली जात आहे. जयललिता यांना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती डॉ. बेले यांनी दिली.

जयललिता यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने कार्यकर्त्यांनीही रुग्णालयाबाहेर गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्रीय गृहमंत्र्यांनी तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी असलेले सी विद्यासागरराव यांना तात्काळ तामिळनाडूला जाण्याचे आदेश दिले. सी विद्यासागर यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी फोनवरून राव यांच्याशी बातचीत केली. दोघांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. तसंच केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जयललिता यांच्या प्रकृती माहिती दिली.

या दरम्यानच्या काळात रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला. तसंच तामिळनाडू पोलिसांना हायलअलर्टचा इशारा देण्यात आला. सध्या तामिळनाडूचे 75 टक्के पोलीस चेन्नईत दाखल झाले असून हॉस्पिटलला छावणीचे स्वरुप आलं आहे. तर चेन्नईतली सर्व दुकानं आणि पेट्रोलपंप आज बंद ठेवण्यात आली आहे.

- जयललिता यांच्या निवसस्थनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

- निवस्थानी येणा-या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे

- मोठ्या प्रमाणात पोलीस सर्वत्र तैनात

- सीआरपीएफ जवानांना अलर्ट राहणाचे आदेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 5, 2016, 10:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading