S M L

LIVE : 'भारत बंद' नव्हे, विरोधक पाळणार 'जन आक्रोश दिवस'

Samruddha Bhambure | Updated On: Nov 28, 2016 09:46 AM IST

LIVE : 'भारत बंद' नव्हे, विरोधक पाळणार 'जन आक्रोश दिवस'

28 नोव्हेंबर : मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात विरोधकांकडून आज (सोमवारी) 'जन आक्रोश दिवस' पाळण्यात येणारे. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळावा म्हणून काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जात असून अन्य विरोधी पक्षही यामध्ये सामील झाले आहेत. जागोजागी मोर्चे आज काढून या निर्णयाला विरोध करण्यात येईल. तर संसदेतही गेल्या दोन आठवड्यांपासून या विषयावर गदारोळ झाल्याने कामकाज होऊ शकलेलं नाही. ही कोंडी आजही कायम राहण्याची शक्यता आहे.

सरकारने कोणताही विचार न करता हा निर्णय लागू केल्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता मात्र यात भरडली जात आहे. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना चलनटंचाईचा फटका बसत आहे. नोटा बदलण्यासाठी व बँकातून रक्कम काढण्यासाठी लोकांना बँकांच्या बाहेर रांगेत उभे राहावे लागत आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या निषेधार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंबंधी संसदेत स्पष्टीकरण द्यावं यासाठी विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती.


मात्र लोकांना आधीच नोटबंदीचा त्रास सहन करावा लागत असताना हा त्रास नको अशी भूमिका तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी घेतली. त्यानंतर जदयु, तेलंगण राष्ट्र समिती, कर्नाटक काँग्रेस यांनीही केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. अशात विरोधकांच्या विरोधातली हवाच निघुन गेल्यामुळे अखेर काँग्रेसनेनोटाबंदीविरोधात ‘जन आक्रोश दिन’ पाळून देशभरात आंदोलन करण्यात येईल, आणि कोणताही बंद नसणार असल्याचं काल, रविवारी स्पष्टी केलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या बंदला पाठिंबा न देण्याचेही आवाहन केलं जात आहे. या बंदमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बंदमध्ये रिक्षा, टॅक्सी आदी या संपात सहभागी झाले तर वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आजचं हे जनआक्रोश आंदोलन राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असून ते कितपत यशस्वी ठरणार, याकडे राजकीय वर्तुळासह अनेकांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2016 09:31 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close