राष्ट्रीय महामार्गांवर 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफी

राष्ट्रीय महामार्गांवर 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफी

  • Share this:

mumbai vashi toll24 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटाबंदीची मुदत संपत येत असताना केंद्र सरकारने आज पुन्हा एक दिलासा दिला. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफीची मुदत 2 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलीये.

500 आणि 1000 च्या नोटबंदीमुळे सुट्टापैशांची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेतला. आज सलग चौथ्यांदा टोलमाफीमध्ये वाढ करण्यात आलीये. याअगोदर टोलमाफी 24 नोव्हेंबरपर्यंत होती. ती आता सात दिवसांनी वाढवण्यात आलीये.2 डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 24, 2016, 4:58 PM IST

ताज्या बातम्या