रिझर्व्ह बँक तब्बल 20 अब्ज नोटांची अशी लावणार विल्हेवाट !

रिझर्व्ह बँक तब्बल 20 अब्ज नोटांची अशी लावणार विल्हेवाट !

  • Share this:

 Briquetes_ (3)

23 नोव्हेंबर : भारत सरकारने नोटबंदी जाहीर केली तेव्हापासून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांची विल्हेवाट कशी लावणार हा प्रश्न विचारला जातोय. रिझर्व्ह बँकेला सुमारे 20 अब्ज नोटांची विल्हेवाट लावावी लागणार आहे. रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी एक विशिष्ट पद्धत अवलंबली जाणार आहे.

याआधीही जीर्ण झालेल्या नोटांची विल्हेवाट लावून त्याजागी नव्या नोटा छापल्या जायच्या. या नोटांचा लगदा ब्रिक्वेट्स नावाच्या इंधनामध्ये वापरला जातो. ब्रिक्वेट्स या इंधनामध्ये चारकोल, लाकडाचा भुसा, लाकडाचे कपटे आणि कागद यांचं मिश्रण असतं. कारखान्यांमधल्या बॉयलर्समध्ये हेच इंधन वापरलं जातं.

Briquetes_ (4)अशा प्रकारच्या प्लँटमधून जे इंधन मिळतं ते स्वयंपाकासाठी आणि दिवे उजळण्यासाठीही वापरलं जातं. हे इंधन कोळशापेक्षा स्वस्त आहे आणि कमी प्रदूषण निर्माण करणारं आहे. ब्रिक्वेट्स इंधनाचा साठा करणं आणि ते कोळशासारखं दुसरीकडे नेणंही सोपं आहे.

नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी भारतातल्या बँकांनी 27 यंत्रं वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये पाठवलीयत. या यंत्रांमध्ये नोटांची विल्हेवाट लावली जाईल आणि मग हा लगदा एकत्र केला जाईल. हा लगदा वापरून ब्रिक्वेट्स इंधन बनवलं तर त्याचा योग्य वापर होईल.

Briquetes_ (2)काही वेळा या नोटांचा कागद रिसायकल केला जातो आणि फाईल, कँलेंडर, पेपर वेट, पेन स्टँड अशा वस्तूही बनवल्या जातात. रिझर्व्ह बँकेला भेट देणा•यांना भेटवस्तू देण्यासाठीही याचा उपयोग केला जातो.

20 अब्ज नोटांची विल्हेवाट लावणं हे रिझर्व्ह बँकेसाठी फार मोठं आव्हान नाहीये. कारण 2015- 2016 या वर्षात रिझर्व्ह बँकेने जीर्ण झालेल्या 16 अब्ज नोटांची विल्हेवाट लावलीय. त्यामुळेच यंत्राद्वारे एवढ्या अब्जावधी नोटांचा लगदा केला जाणार आहे. नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी जगभरामध्ये ही ब्रिक्वेट्स पद्धती वापरली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 23, 2016, 6:33 PM IST

ताज्या बातम्या