दोषींवर कठोर कारवाई केली जाईल - सुरेश प्रभू

  • Share this:

Suresh-Prabhu

20 नोव्हेंबर :   पाटणा-इंदूर एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. 'चौकशीत दोषी आढळलेल्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,' असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

इंदूरहून पाटण्याच्या दिशेनं निघालेल्या गाडीचे १४ डबे रुळावरून घसरून आज पहाटे अपघात झाला. त्यात आतापर्यंत 100 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाले असून 150 हून अधिक जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. या दुर्घटनेबद्दल सुरेश प्रभू यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.

‘अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना युद्धपातळीवर वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वेचे मोबाइल मेडिकल युनिटदेखील दुर्घटनास्थळी पोहोचले आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मी स्वत: अपघातस्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे,' अशी माहितीही प्रभू यांनी ट्विटरवरून दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2016 05:53 PM IST

ताज्या बातम्या