पाटणा-इंदूर एक्सप्रेस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा ओघ

 पाटणा-इंदूर एक्सप्रेस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा ओघ

  • Share this:

t-9

20 नोव्हेंबर :  उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ पाटणा-इंदूर एक्सप्रेस गाडीचे १४ डबे रुळावरून घसरल्यानं झालेल्या भीषण अपघातात 96  प्रवासी ठार, तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या घटनेची चौकशीचे आदेश देत, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३.५ लाख रुपयाची मदत तर जखमींना ५० हजारांची मदत रेल्वेकडून जाहीर केले.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली. गंभीर जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई तर किरकोळ जखमींना प्रत्येकी २५ हजाराची मदतही त्यांनी जाहीर केली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाखाची तर जखमींनी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2016 03:02 PM IST

ताज्या बातम्या