झाकिर नाईकविरोधात एनआयएकडून एफआयआर दाखल

झाकिर नाईकविरोधात एनआयएकडून एफआयआर दाखल

  • Share this:

zhakir_naik19 नोव्हेंबर : स्वयंघोषित इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक याच्यावर अखेर एफआयआर दाखल करण्यात आलीये. NIA च्या वतीने ही एफआयआर दाखल करण्यात आलीये. दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याचा ठपका झाकिरवर ठेवण्यात आलाय.

बांग्लादेशमधील ढाकामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सापडलेल्या दहशतवाद्याने झाकिर नाईक यांच्या भाषणांनी प्रेरित होऊन आपण हे कृत्य केल्याचं सांगितलं होतं. तेंव्हापासून झाकिर नाईक आणि त्याची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही संस्था तपास यंत्रणांच्या रडारवर आली होती.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने त्याच्या या संस्थेवर बंदी घातली. आणि त्यानंतर आता झeकिरवर एफआयआर दाखल करण्यात आलीये. याबाबत एनआयएने भारतभर आठ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात झाकिरचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे पुरावे समोर आल्यामुळेच ही कारवाई करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 19, 2016, 2:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading