लग्नासाठी अडीच लाख रुपये बँकेतून काढता येणार - शक्तिकांत दास

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Nov 17, 2016 10:51 PM IST

लग्नासाठी अडीच लाख रुपये बँकेतून काढता येणार - शक्तिकांत दास

Shashikant Das Banner131 new

17 नोव्हेंबर : मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेकांची लग्न खोळंबली आहेत. मात्र त्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ज्यांच्या घरी लग्न आहे, त्यांना आता लग्नासाठी अडीच लाख रुपये बँकेतून काढता येणार  असल्याची माहिती,  केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी दिली आहे. पण त्यासाठी लग्नपत्रिका असणं अनिवार्य असल्याचंही दास यांनी स्पष्ट केलं आहे.

एवढंच नाही तर, शेतकरी तसंच आडत व्यापार्‍यांनाही मोठा दिलासा देत सरकारनं आज मोठ्या घोषणा केल्या आहे. शेतकरी आता आठवड्यातून 25 हजार रूपये काढू शकतात येणार आहेत. तर आडत व्यापार्‍यांना 50 हजार रूपये काढण्याची मुभा देण्यात आलीय. यासोबतच, ज्या शेतकऱ्यांवर क्रॉप लोन आहे, त्यांना त्याचे पैसे भरण्यासाठी  15 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

सरकारनं नोटबंदी केलीय तेव्हापासून देशभरात शेतकर्‍यांना सर्वाधिक फटका बसतोय. विरोधकांनी काल हा संसदेत मुद्दा उपस्थित केला होता. त्यापार्श्वभूमीवर आज केलेल्या घोषणा शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणाऱ्या आहेत.

पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर त्या बदल्यात बँकांतून बदलून मिळणाऱ्या पैशांची मर्यादा कमी करण्यात आली आहे. उद्यापासून नव्या नोटांच्या स्वरूपात साडेचार हजार रुपयांऐवजी २ हजार रुपयेच मिळणार आहेत. त्याचवेळी, नोटांबदीमुळं नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकारनं काही नव्या घोषणा केल्या आहेत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2016 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...