परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची किडनी फेल

  • Share this:

16 नोव्हेंबर :  केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाल्या आहे. त्यांच्यावर दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्या डायलिसिसवर असून लवकरच त्यांच्यावर किडनी ट्राँन्सप्लांटची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

Sushma_B_25122015

खुद्द सुषमा स्वराज यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. 'किडनू निकामी झाल्यामुळं मी सध्या 'एम्स'मध्ये आहे. डायलिसिस सुरू आहे. किडनी ट्राँन्सप्लांटसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. या संकटातून श्रीकृष्ण माझं रक्षण करेल,' असं ट्विट त्यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वराज यांच्या प्रकृतीत सातत्यानं चढउतार होत आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही त्यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2016 12:30 PM IST

ताज्या बातम्या