मोदींचा कोट विकत घेणाऱ्या लालजीभाईंनी केले 6 हजार कोटी जमा ?

मोदींचा कोट विकत घेणाऱ्या लालजीभाईंनी केले 6 हजार कोटी जमा ?

  • Share this:

laljibhai_patel15 नोव्हेंबर : तुम्ही आम्ही पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बँकेत बदलण्यासाठी रांगेत उभे आहोत आणि दुसरीकडे देशात असेही काही व्यापारी आहेत ज्यांना बँकेत पैसा जमा कसा करायचा याची चिंता असावी. तुम्हाला आश्चर्य वाटेल सुरतचे एक व्यापारी ज्यांचं नाव लालजीभाई पटेल आहे त्यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल सहा हजार कोटी रूपये सरकार जमा केल्याचं वृत्त व्हायरल झालंय. मात्र, खुद्द लालजीभाईंनी मात्र हे वृत्त फेटाळलंय.

सहा हजार कोटी रूपये जमा केल्याचं वृत्त मात्र लोकल मीडियानं दिलंय. हे तेच लालजीभाई आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींचा कोट विकत घेतला होता आणि ज्यावरही मोठा वाद झाला होता. लालजीभाई हे दानशूर म्हणूनही ओळखले जातात. काही काळापूर्वी त्यांनी लहान मुलींच्या शिक्षणासाठी दोनशे कोटी रुपये दान केले होते.

आता लालजीभाईंनी खरंच सहा हजार कोटी रूपये जमा केलेत का ?, केले नसतील तर मग सुरतचा स्थानिक मीडियानं हे वृत्त एवढं का उचलून धरलंय, जमा केलेले पैसे हे काळ्या पैशात मोडतात का ?, टॅक्स भरला आहे का ? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 15, 2016, 4:07 PM IST

ताज्या बातम्या