'...जर नोटेचा रंग गेला नाही तर तुमची नोट नकली'

'...जर नोटेचा रंग गेला नाही तर तुमची नोट नकली'

  • Share this:

2000_note15 नोव्हेंबर : जर तुमच्याकडे 2000 रुपयाची नोट असेल आणि तिचा रंग गेला तर ती खरी आहे आणि जर रंग नाही गेला तर ती नोट नकली आहे असा आश्चर्यकारक खुलासा अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केलाय.

2000 हजाराच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. पण या नव्या नोटेला वेगळेचे ग्रहण लागले. नोटांचा रंग जात असल्यामुळे लोकं गोंधळात सापडले आहे. नव्या नोटांवर असलेली गुलाब रंग निघत असल्याचं समोर आलंय. ही नोट जर पुसली तर गुलाबी रंग कापडाला लागत असल्याचं पुढं आलंय. या प्रकरणी काही सामाजिक संस्थांनी पोलिसांत तक्रार दाखलही केलीये.

पण, अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद याबाबत खुलासा केला. 2000 च्या नोटेचा रंग जातोय याबद्दल पॅनिक होण्यासारखं काही नाही. या नोटेचा रंग खोडायचा प्रयत्न केला तर रंग जाणारच आहे. एका ठराविक काळानंतर नोटेचा रंग जाणं अपेक्षितच आहे. नव्या नोटेची रचनाच तशी असल्यामुळे रंग जातोय. जर तुमच्या नोटेचा रंग गेला नाहीतर ती नोट बनावट असू शकते असा दावा दास यांनी केलाय. तसंच बँकेतील रांगा रोखण्यासाठी पैसे काढणा•यांच्या बोटाला मतदानाची शाई लावण्यात येईल असंही दास यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 15, 2016, 2:27 PM IST

ताज्या बातम्या