भारतीय जवानांनी ना'पाक' हल्ला परतवला, पाक अधिकाऱ्यासह 7 जवान ठार

भारतीय जवानांनी ना'पाक' हल्ला परतवला, पाक अधिकाऱ्यासह 7 जवान ठार

  • Share this:

loc_border14 नोव्हेंबर : भारतीय सीमारेषेवर भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याचा ना'पाक' हल्ला परतवून लावला आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर देत एका अधिका-यासह 7 जवानांना ठार मारलंय. तर अनेक जवान जखमी झाले आहे.

सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोशहरा आणि सुदंरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याची स्पेशल टीम ज्यामध्ये 21 रावळपिंडी एसएसजीचे 4 शार्पशुटर, नॉर्देन लाइट इंफ्रंटीचे 14 जवान आणि इतर तीन दलातील 16 ते 18 जवानांनी भारतीय चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय चौक्या उद्ध्‌वस्त करण्याचा इरादा पाक सैन्याचा होता. पण, सतर्क भारतीय जवानांनी पाक जवानांना सडेतोड उत्तर दिलं. या कारवाईत पाक अधिका-यासह 7 जवान ठार झाले. यात रावळपिंडी स्पेशल स्ट्राइकर ग्रुपचे 3 शार्पशुटरचाही समावेश आहे.

या कारवाईत 12 हुन अधिक पाक जवान जखमी झाले तर काही जणांनी पळ काढला. ही कारवाई रात्री 1.30 ते 3 च्या दरम्यान झाली. या कारवाईत भारतीय सैन्याचं कोणतंही नुकसान झालं नाही.

तर दुसरीकडे पाक मीडियाने या कारवाईचं भारतावरच खापर फोडलं. भारतीय जवानांनीच सीमारेषेवर भिंबर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या गोळीबारात 7 पाक जवान शहीद झाले. एवढंच नाहीतर पाक सैनिकांनी गोळीबार केला नव्हता भारतीय सैनिकांनीच गोळीबार केला असा दावाही पाक मीडियाने केला.

मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाक सैनिकांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये भारतीय चौक्यांना लक्ष केलं होतं. भारतीय सैन्याने प्रतिउत्तर देत पाक चौक्यांवर हल्लाबोल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 14, 2016, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading