S M L

एटीएम पूर्ववत होण्यासाठी 2-3 आठवडे लागतील -जेटली

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2016 06:20 PM IST

एटीएम पूर्ववत होण्यासाठी 2-3 आठवडे लागतील -जेटली

12 नोव्हेंबर : नोटबंदी झाल्यामुळे काही दिवस सर्वांना त्रास होईल. हे एक मोठं ऑपरेशन आहे. एटीएम  पूर्ववत होण्यासाठी 2-3 आठवडे लागतील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. रोख पैशांची कमतरता नाही, पुरेसे पैसे उपलब्ध आहेत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

500 आणि 1000 च्या नोटबंदीनंतर देशभरात हाहाकार उडालाय. लोकांनी बँकाबाहेर रांगाच रांगा लावल्या आहे. या परिस्थितीवर अर्थमंत्री अरुण जेटली नजर ठेवून आहे. आज पत्रकार परिषद घेऊन रोख पैशांची कमतरता नाही, रिझर्व्ह बँकेकडे पुरेसे पैसे उपलब्ध आहे अशी ग्वाही दिलीये. तसंच मोठ्या प्रमाणात चालणारा व्यवसाय काळ्या पैशांतच का असतो. ही काळ्या पैशांची साखळी मोडून काढण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं जेटली म्हणालेत.

बँकेत आधीच गर्दी असल्यामुळे कर्मचा-यांवर ताण पडू नये म्हणून बँकेतून आम्ही रोजा डेटा मागवत नाही अशी माहितीही त्यांनी दिली. एटीएममशीनमध्ये नव्या नोटांसाठी तांत्रिक दुरस्ती करण्यासाठी वेळे लागणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2016 06:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close