S M L

काळा पैसेवाल्यांना चपराक, बेहिशेबी डिपॉझिटवर 200 टक्के दंड !

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2016 10:26 PM IST

काळा पैसेवाल्यांना चपराक, बेहिशेबी डिपॉझिटवर 200 टक्के दंड !

09 नोव्हेंबर : 'ही शेवटची संधी आहे' अशी सुचना देऊनही पैसा दडवून ठेवणाऱ्यांना आता मोदी सरकारने आणखी एक धक्का दिलाय. जर तुम्ही उद्या बँकेत पैसे भरणार असाल आणि तुमची रक्कम उत्पन्नापेक्षा जास्त आढळली तर तुम्हाला इन्कम टॅक्ससोबत तब्बल 200 टक्के दंड भरावा लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय काल जाहीर केला. त्यामुळे आजपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. आता आपली लाखमोलाची संपत्ती वाचवण्यासाठी बँक गाठावी लागणार आहे. बँकेत उद्यापासून पैसे भरता येणार आहे. पण, इथं सरकारची तुमच्यावर करडी नजर असणार आहे.

2.5 लाखाहुन अधिक रक्कम भऱली जाईल त्यावर कारवाई होणार आहे. प्रतिज्ञापत्रात लिहिलेल्या रक्कमेशी तुम्ही डिपॉझिट भरत असलेली रक्कम जर जुळली नाहीतर इन्कम टॅक्सबरोबर 200 टक्के दंड तुम्हाला भरावा लागणार आहे अशी माहिती अर्थसचिवांनी दिलीये. 2.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम असेल आणि उत्पन्न जर कमी असेल तर कारवाई होणार नाही असंही स्पष्ट केलं. त्यामुळे आता ज्यांच्याकडे काळा पैसा असेल अशा लोकांना हा मोठा धक्का असणार आहे. 

काळा पैसेवाल्यांना चपराक

- काळ्या पैसेवाल्यांना आणखी मोठा धक्का

Loading...

- उत्पन्नापेक्षा जास्त डिपॉझिटला जबर दंड

- 200% दंडाची तरतूद

-इन्कम टॅक्सबरोबर 200% दंड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2016 10:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close