05 नोव्हेंबर : बेळगावात मराठी भाषिकांची गळचेपी सुरुच आहे. बेळगावातील कन्नड संघटनांनी महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिन आणि नाम फलकाला काळं फासलं. याप्रकरणी कन्नड संघटनांच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. तर दुसरीकडे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेने कोल्हापूरच्या सीमेवर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहनं अडवली आहेत. यासगळ्यात प्रवाशांचे अतोनात हाल होत असून पोलीस बंदोबस्तात प्रचंद वाढ करण्यात आली आहे.
बेळगावात कर्नाटक दिन हा काळा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी एक फेरी काढण्यात आली. या फेरीत महापौर आणि उपमहापौर सहभागी झाल्याने यावर नवा वाद उभा राहिला. त्यामुळे त्यांना कडाडून विरोध करण्यासाठी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिन आणि नाम फलकाला काळे फासले. तसेच या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारांच्या केबिनलाही काळं फासलं. तर या फेरीत सहभागी झालेल्या 40 मराठी तरुणांना कर्नाटक सरकारने अटक केली. त्यानंतर वादाची ठिणगी पडली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा