जीएसटीचे दर जाहीर, 'अच्छे दिन' येणार ?

जीएसटीचे दर जाहीर, 'अच्छे दिन' येणार ?

  • Share this:

GST Bill03 नोव्हेंबर : अच्छे दिनचं स्वप्न दाखवणा-या भाजप सरकारने बहुचर्चित जीएसटी विधेयकातून स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीचा दर आज केंद्र सरकारने जाहीर केला. 5 टक्के ते 28 टक्के या दरम्यान जीएसटीची आकारणी केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे 12 ते 18 टक्क्यांच्या दरम्यान करआकारणी होईल. तंबाखू तसंच महागड्या कार्सवर सगळ्यात जास्त म्हणजेच 28 टक्के कर आकारला जाणार आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी क र आकारणी जाहीर केलीये. यामध्ये 5 टक्के, 12, 13, 18 आणि चौथ्या टप्प्यात 28 दर निर्धारित केले आहे. या निर्णयाला सर्वांनी सहमती दर्शवली आहे. 12 ते 18 टक्क्यांच्या दरम्यान करआकारणी लागू राहणार आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांवर 5 टक्के करासह अधिभारही लागणार आहे. सीपीआईमध्ये सहभागी असलेल्या 50 टक्के उत्पादनांवर कोणताही कर असणार नाही. जास्त विक्री होणा•या पदार्थावर 5 टक्के कर लागणार आहे. मात्र, सोन्यावर अजूनही कोणतेही कर लावण्याचा निर्णय तुर्तास झाला नाहीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 3, 2016, 10:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading