पाकिस्तानकडून रात्रीपासून गोळीबार सुरू, भारताचं चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानकडून रात्रीपासून गोळीबार सुरू, भारताचं चोख प्रत्युत्तर

  • Share this:

LOCAttack

28 ऑक्टोबर :  पाकिस्तानकडून अनेक दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.  जम्मू-काश्मीरच्या बहुतेक भागात पाकिस्तानकडून काल (गुरूवारी) रात्रीपासून गोळीबार सुरू आहे. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतात दिवाळीचा उत्सव सुरू असताना तिकडे सीमेवर पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरू आहेत. पाकिस्तानकडून गुरूवारी रात्रीपासून आंतराष्ट्रीय सीमारेषेवर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला जात आहे. कठुआ, सांबा, अखनूर सेक्टरमध्ये रात्रभर तर नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी पहाटे पाचपासून गोळीबार केला आहे. भारतीय लष्करही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असून पाकिस्तानातील काही तळही उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे.

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत वारंवार गोळीबार केला जात आहे.  पाकिस्तानकडून आणखी जोरदार गोळीबाराची शक्यता धरून भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 28, 2016, 9:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading