S M L

'जीओ'ला सेवा न पुरवल्यामुळे तीन कंपन्यांला 3 हजार 50 कोटींचा दंड

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2016 06:20 PM IST

'जीओ'ला सेवा न पुरवल्यामुळे तीन कंपन्यांला 3 हजार 50 कोटींचा दंड

22 ऑक्टोबर : तुमच्याकडे जीओचं कार्ड असेल आणि त्यावर कॉल फेल होत असतील त्याला जबाबदार व्होडाफोन, आयडीया, एअरटेल कंपन्या आहे. त्यामुळेच ट्रायने या तिन्ही कंपन्यांना तब्बल 3 हजार 50 कोटींचा दंड ठोठावलाय.

रिलायन्सने मोठ्या दिमाखात जीओ सेवा सुरू केली. डिसेंबरपर्यंत डेटा आणि कॉलिंग फ्री दिल्यामुळे लोकांनी उड्या घेतल्यात. मात्र जीओला इंटर कनेक्टीव्हीटी न पुरवल्याबद्दल व्होडाफोन, आयडीया, एअरटेल कंपन्यांना ट्रायनं जवळपास 3 हजार 50 कोटी रूपयांचा दंड ठोठावलाय. त्यावरचा अंतिम निर्णय आता दुरसंचार मंत्रालय घेणार आहे.

ट्रायनं ठोठावलेल्या दंडात एअरटेलला 1050 कोटी रूपये, व्होडाफोनलाही जवळपास हजार कोटी आणि आयडीया मोबाईलला 950 कोटी रूपयांचा समावेश आहे. जीओला कनेक्टीव्हीटी न पुरवल्यामुळे ह्या कंपन्यांचा लायसन्स का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही कंपन्यांना पाठवण्यात आलीय. पण तसं झालं ग्राहकांचा खुप गोंधळ होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2016 06:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close