S M L

सुप्रीम कोर्टाचा दणका, बीसीसीआयची सर्व खाती गोठवली

Samruddha Bhambure | Updated On: Oct 21, 2016 01:34 PM IST

सुप्रीम कोर्टाचा दणका, बीसीसीआयची सर्व खाती गोठवली

20 ऑक्टोबर :  लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करणाऱ्या बीसीसीआयला सुप्रीम कोर्टाने आज (शुक्रवारी) जबरस्त दणका दिला आहे. बीसीसीआय आणि राज्या क्रिकेट संघटनांमध्ये होणारे आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचे आदेश यावेळी सुप्रीम कोर्टाने दिले आहे. त्याचबरोबर लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी 2 आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही बीसीसीआयने दिले आहे.

लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यावरून बीसीसीआय आणि समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन संघर्ष सुरू आहे. बीसीसीआयनं यासंदर्भात न्यायालयात धाव घेऊन शिफारसी लागू करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळताना कोणत्याही परिस्थितीत शिफारसी लागू कराव्याच लागतील, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयवर सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं यापुढं राज्य क्रिकेट संघटनांना बीसीसीआयकडून मिळणारी आर्थिक मदत पूर्णपणे बंद होणार आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे. तसंच आता बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना 15 दिवसात स्वतः कोर्टात हजर राहून प्रतिज्ञापत्र सादर करायचे निर्देशही देण्यात आलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2016 01:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close