दिल्लीत 'मेड इन चायना'चा फुसका बार, दिल्लीकरांचा बहिष्कार

दिल्लीत 'मेड इन चायना'चा फुसका बार, दिल्लीकरांचा बहिष्कार

  • Share this:

20 ऑक्टोबर : दिवाळीसाठी आकाशकंदिल, दिव्यांच्या माळा घ्यायच्या तर चिनी बनावटीच्या घेऊ नका, असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. आणि त्यामुळे दिल्लीत चिनी वस्तूंच्या विक्रीमध्ये 30 टक्क्यांची घट झालीय. दिल्लीतल्या चाँदनी चौकमध्ये चिनी वस्तूंची देशातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पण या बाजारपेठेत चिनी वस्तूंची मागणी घटलीय.

chaina_marketभारत आणि पाकिस्तानच्या वादात चीनने पाकिस्तानची बाजू घेतली. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असं आवाहन सोशल मीडियातून केलं जात होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय लोकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं ठरवलं. याचा फटका व्यापाऱ्यांना बसलाय.

दिवाळी जवळ आली की दिल्लीमधली चाँदनी चौकची बाजारपेठ सजते ती झगमगत्या माळा आणि आकर्षक आकाश कंदिलांनी. चिनी वस्तूंच्या आकर्षणामुळे या बाजारपेठेत मोठी गजबज असते. चिनी वस्तू स्वस्तही मिळतात त्यामुळे या वस्तूंना मोठी मागणी असते. यावर्षी मात्र तुलनेनं गर्दी कमी दिसतेय. त्यामुळे आधीच घेऊन ठेवलेल्या मालाचं करायचं काय, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडलाय.

चिनी वस्तूंवर बहिष्कार असला तरी याचा फटका मात्र भारतीय व्यापाऱ्यांनाच बसेल,असं इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. दिवाळीच्या काळात दिल्लीत चीनी वस्तूंची कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र यावर्षी नॉयडातल्या व्यापाऱ्यांना दीडशे कोटींची ऑर्डर रद्द करावी लागली. हे वातावरण असंच राहिलं तर भारतीय आणि चिनी व्यापाऱ्यांमध्ये नवं शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 20, 2016, 9:52 PM IST

ताज्या बातम्या