S M L

तुमचं एटीएम सुरक्षित तर आहे ना ?, 32 लाख एटीएमचा डाटा चोरीला

Sachin Salve | Updated On: Oct 20, 2016 12:50 PM IST

atm_thef20 ऑक्टोबर : तुमच्या एटीएम कार्डची सुरक्षा धोक्यात आलीय आणि असे जवळपास 32 लाख एटीएम कार्डस आहेत ज्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विशेष म्हणजे याच कारणामुळे एसबीआयनं अगोदरच सहा लाख कार्ड ब्लॉक केलेले आहेत. आणि आता ज्या बँकांच्या एटीएमना धोका निर्माण झालाय. त्यात एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय तसच येस बँक अशा बड्या बँकांचा समावेश आहे.

ज्या 32 लाख एटीएम कार्डाची सुरक्षा धोक्यात आहे. त्यातले 26 लाख हे व्हीसा आणि मास्टरकार्ड आहेत. जेव्हा की 6 लाख हे रूपे कार्ड आहेत. अनेक जणांनी अशी तक्रार केलीय की, त्यांच्या कार्डावर चीनमध्ये खरेदी केल्याचं दाखवलं गेलंय. जेव्हा की हे तिथं कधीच गेलेले नाहीत. ह्या सगळ्या फ्रॉडचं कारण हिटाची पेमेंट सर्व्हिसेसमध्ये मालवेअर व्हायरस घुसल्याचं सांगितलं जातंय. ह्या व्हायरसमुळे तुमच्या एटीएम कार्डची माहिती चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँका एटीएमचं पीन बदलायला सांगत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2016 12:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close