पाक कलाकारांना भारतात काम करण्याची गरज काय ? -नगमा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2016 07:20 PM IST

पाक कलाकारांना भारतात काम करण्याची गरज काय ? -नगमा

nagma33318 ऑक्टोबर : सध्या देशभरात गाजत असलेल्या पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम न देण्याच्या वादात आता माजी बॉलिवूड अभिनेत्री आणि विद्यमान काँग्रेस नेत्या नगमा यांनी उडी घेतली आहे. आजच्या या परिस्थितीला नरेंद्र मोदींची रणनीती जबाबदार आहे अशी टीका नगमा यांनी केलीये. तसंच तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे पाक कलाकारांनी भारतात येऊन काम करण्याची गरज काय ? असा सवालच नगमांनी उपस्थिती केला.

आमच्या आयबीएन 7 च्या प्रतिनिधींशी बोलताना नगमा म्हणाल्या की, आज आपले जवान सिमेवर आपले रक्त सांडत असताना आपण पाकिस्तानी कलाकारांविषयी एवढा विचार करण्याची किंवा चर्चा करण्याची काय गरज आहे? दोन्ही देशात तणाव असल्यामुळे पाक कलाकारांना भारतात येण्याची गरज काय?, आपले जवान सुद्धा गुलाम अलीचे गाणी ऐकता आणि पाकचे जवान सुद्धा लता मंगेशकर यांची गाणी ऐकतात. पण आजची परिस्थिती पाहता पाक कलाकारांनी भारतात येऊन काम करण्याची गरज तरी काय आहे ? असा सवालही नगमांनी उपस्थिती केला.

उरी हल्ल्यामुळे आपल्या देशातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. पण याला केवळ केंद्र सरकार आणि त्यांची पाकिस्तानविरोधात आखलेली चुकीची रणनीतीच जबाबदार आहे. आपल्याला पाकिस्तानशी मैत्रीचा एवढा वाईट अनुभव असताना, पुन्हा मैत्रीचा हात का दिला ? ज्यामुळे आपल्या कितीतरी सैनिकांचा नाहक बळी गेला. हे लोक आधी बोलायचे, आमचे सरकार आले की, जशाच तशे उत्तर देऊ, मग आता काय झाले ? कुठे गेल्या त्या गर्जना असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे पंतप्रधान मोदींनी नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकमध्ये जाऊन बिर्यानी खायची मग पाक कलाकार सिनेमात का नको ? असा टोलाही नगमांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2016 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...