उ.प्रदेशच्या निवडणुकीत पुन्हा 'मंदिर वही बनायेंगे'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2016 10:22 PM IST

उ.प्रदेशच्या निवडणुकीत पुन्हा 'मंदिर वही बनायेंगे'

ayodha317 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमुळे भाजपच्या काही मंत्र्यांनी पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'चा सूर आळवलाय. केंद्रीय मंत्री महेश शर्मा उद्या अयोध्येमधल्या वादग्रस्त जागेला भेट देणार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकीत भाजप हिंदुत्वाचा अजेंडा वापरणार का, असा प्रश्न विचारला जातोय.

सजिर्कल स्ट्राईक, राम मंदिर आणि विकास यापैकी कोणत्या मुद्द्यावर भाजप भर देणार यावरही चर्चा सुरू झालीय. याआधीच भाजपने देशात समान नागरी कायदा आणण्याची घोषणा केलीय. त्याला मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने विरोध केलाय. त्यामुळे उत्तर प्रदेशात मतांच्या ध्रुवीकरणाला सुरुवात झालीय, असं मानलं जातंय. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत हिंदुत्वाचा अजेंडा राबवावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद या संघटनांचा भाजपवर दबाव आहे, असंही समजतंय.

अयोध्येतल्या वादग्रस्त जागेपासून सुमारे 15 किमीच्या जागेवर रामायणावर आधारित वस्तूसंग्रहालय बांधण्यात येतंय. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 25 एकर जागा दिलीय. दिल्लीमधल्या अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर हे रामायणाचं संग्रहालय बांधण्यात येतंय. याआधी केंद्राच्या आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये भाजपने वेगवेगळ्या पद्धतीने राम मंदिराचा मुद्दा वापरलाय. आता या निवडणुकीत या अजेंड्याला किती यश येतं ते पाहावं लागेल.

भाजप, हिंदुत्व आणि निवडणुका

 लोकसभा निवडणूक 1991

Loading...

- 'मंदिर वहीं बनायेंगे' ही मुख्य घोषणा

 भाजपच्या जाहीरनाम्यातही राम मंदिरावर भर

 लोकसभा निवडणूक 1996

भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा

राम मंदिर उभारणीचा पुनरुच्चार

 

लोकसभा निवडणूक 1998

- भाजपच्या प्रचारातून हिंदुत्वाचा मुद्दा गायब

राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्याचा नाममात्र उल्लेख

 

लोकसभा निवडणूक 2004

- 'इंडिया शायनिंग' ची घोषणा

हिंदुत्वाचा मुद्दा गायब

पण जाहीरनाम्यामध्ये मंदिर बांधण्याचं आश्‍वासन

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2012

- लालकृष्ण अडवाणींनी पुन्हा आणला राम मंदिराचा मुद्दा

जाहीरनाम्यामध्ये उल्लेख पण आश्‍वासन मात्र नाही.

लोकसभा निवडणूक 2014

- विकास आणि रोजगार निमिर्तीवर संपूर्णपणे भर

जाहीरनाम्यामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी घटनात्मक शक्यता पडताळण्याचं आश्‍वासन

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2016 10:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...