प्रभा राव यांचे निधन

26 एप्रिलराजस्थानच्या राज्यपाल प्रभा राव यांचे आज दिल्लीत निधन झाले. जोधपूर हाऊस या राजस्थान सरकारच्या विश्रामगृहात प्रभा राव यांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रपती प्रतिभा पाटील, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, मुकूल वासनिक, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी राव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. अंत्यदर्शनासाठी उद्या सकाळी त्यांचे पार्थिव नागपूरला नेले जाणार आहे. आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कोल्हापूर गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रभा राव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र सरकार एक दिवसाचा दुखवटा पाळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. 4 मार्च 1935 रोजी जन्म झालेल्या प्रभाराव शालेय जीवनापासूनच उत्तम ऍथलेट म्हणून प्रसिद्ध झाल्या. लांब उडी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्वही केले होते. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रभाताई 2004 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेल्या. खासदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि राज्यपाल म्हणून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. काँग्रेसमध्ये सर्वांना सांभाळून घेणारे व्यक्तीमत्व हरपले. प्रदेशाध्यक्ष असताना केवळ संघटनच नव्हे तर मंत्रिमंडळाच्या निर्णयावरही त्यांचा प्रभाव असे. त्यांच्या निधनामुळे विदर्भ, महाराष्ट्र आणि काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. तर प्रभा राव प्रदेशाध्यक्ष असताना मुख्यमंत्री असणारे सध्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, त्यांनी संघटनेला नवे बळ दिले. प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात त्या महाराष्ट्रभर फिरल्या. सर्व कार्यकर्त्यांशी त्यांचा जवळचा संपर्क होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता सोनिया गांधी यांच्या विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम केले. मंत्री, आणि खासदार म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या जाण्याने तरूण, ज्येष्ठ अशा सर्वांनाच सांभाळून घेणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरवले आहे. काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2010 08:08 AM IST

प्रभा राव यांचे निधन

26 एप्रिल

राजस्थानच्या राज्यपाल प्रभा राव यांचे आज दिल्लीत निधन झाले.

जोधपूर हाऊस या राजस्थान सरकारच्या विश्रामगृहात प्रभा राव यांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

राष्ट्रपती प्रतिभा पाटील, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, मुकूल वासनिक, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी राव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

अंत्यदर्शनासाठी उद्या सकाळी त्यांचे पार्थिव नागपूरला नेले जाणार आहे. आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कोल्हापूर गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रभा राव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र सरकार एक दिवसाचा दुखवटा पाळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

4 मार्च 1935 रोजी जन्म झालेल्या प्रभाराव शालेय जीवनापासूनच उत्तम ऍथलेट म्हणून प्रसिद्ध झाल्या. लांब उडी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्वही केले होते. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रभाताई 2004 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेल्या. खासदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि राज्यपाल म्हणून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला.

काँग्रेसमध्ये सर्वांना सांभाळून घेणारे व्यक्तीमत्व हरपले. प्रदेशाध्यक्ष असताना केवळ संघटनच नव्हे तर मंत्रिमंडळाच्या निर्णयावरही त्यांचा प्रभाव असे. त्यांच्या निधनामुळे विदर्भ, महाराष्ट्र आणि काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

तर प्रभा राव प्रदेशाध्यक्ष असताना मुख्यमंत्री असणारे सध्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, त्यांनी संघटनेला नवे बळ दिले. प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात त्या महाराष्ट्रभर फिरल्या. सर्व कार्यकर्त्यांशी त्यांचा जवळचा संपर्क होता.

इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता सोनिया गांधी यांच्या विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम केले. मंत्री, आणि खासदार म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या जाण्याने तरूण, ज्येष्ठ अशा सर्वांनाच सांभाळून घेणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरवले आहे. काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2010 08:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...