S M L

श्रीनगरमध्ये अतिरेक्यांचा भ्याड हल्ला, 2 जवान शहीद

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2016 11:48 PM IST

श्रीनगरमध्ये अतिरेक्यांचा भ्याड हल्ला, 2 जवान शहीद

श्रीनगर,14 ऑक्टोबर : झकुरामध्ये अतिरेक्यांनी जवानांच्या कॅम्पवर भ्याड हल्ला केलाय. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहे तर आठ जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर काश्मीरमध्ये अतिरेकी आणि जवानामध्ये चकमक सुरू आहे. आज संध्याकाळी झकुरा भागात अतिरेक्यांनी जवानांच्या कॅम्पवर हल्ला केलाय. जवानांच्या पेट्रोलिंग व्हॅनवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी परिसरात नाकाबंदी केली असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. याच आठवड्यात पम्पोरामध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. तब्बल 60 तास ही चकमक सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2016 09:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close