बलुचिस्तान, गिलगिटसह संपूर्ण काश्मीर भारताचाच भाग - मोहन भागवत

बलुचिस्तान, गिलगिटसह संपूर्ण काश्मीर भारताचाच भाग - मोहन भागवत

  • Share this:

Bhagwat1321

11 ऑक्टोबर : : काश्मीरमध्ये चिंता वाढवणारी परिस्थिती आहे. पूर्ण काश्मीर भारताचा भाग आहे. मीरपूर, बलुचिस्तान, गीलगीट हा भारताचाच भाग आहेत. काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याऱ्यांविरोधात लष्कराने चांगलं काम केलं आहे. काश्मीरमध्ये एक कौतुकास्पद काम सरकारच्या नेतृत्वात झाले आहे. आम्ही लष्कराचे अभिनंदन करतो. काश्मीरी नागरिकांना फूस लावण्याचं काम सीमेपलिकडून होत आहे. पण भारताच्या यशस्वी नेतृत्वाने पाकिस्तानला एकटं पाडलं आहे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन तसंच विजयादशमी उत्सव आज (मंगळवारी) रेशीमबाग मैदानावर पार पडला. यावेळी बोलताना, त्यांनी नुकत्याच भारताना भारताने पाकव्यप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या पार्श्वभूमीवर मोदींचं भरभरून कौतूक केलं आहे. 'भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतीला जबरदस्त प्रत्युत्तत्तर दिले आहे. यामुळे देशाची जागतीक पादळीवर प्रतिमा तर उंचावलीच. पण भारतीय जवानांचा आत्मविश्वसही वाढला आहे. असं म्हणत त्यांनी त्यांचं अभिनंदनही केलं आहे.

मोदी सरकारची स्तूती

यावर्षीचा विजयदशमीचा उत्सव अनेक कारणांमुळे विशेष आहे.  आजचे सरकार हे काम करणारे आहे, ते उदासिन नाही. हे सरकार काही करेल असा विश्वास देशातील जनतेला आहे. देश पुढे जात आहे, याला कोणी नाकारू शकत नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेद केल्याने भारताने आपली शक्ती दाखवल्याचे सकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत आहेत. जे देश पूर्वी भारताला शांत राहण्याचा सल्ला देत होते, आता तेच देश भारतासोबत आहेत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं. मात्र हे अनेक उपद्रवी शक्तींना खुपत आहे. एवढेच नाही तर या उपद्रवी शक्ती देशा बाहेर तर आहेतच. पण आपल्या देशातही आहेत.  काही स्वार्थी लोकांमुळे याला खतपाणी घालण्यात येत आहे. देशाला पुढे न जाऊ देणाऱ्या शक्ती घुसखोरी करत आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

कायद्याच्या चौकटीत गोरक्षा व्हावी

गोहत्येवर बोलताना भागवत म्हणाले की, गोमाता रक्षण कायद्यांतर्गत राहून करावं. संविधानाच्या मर्यादेत राहूनच गोमातेचं रक्षण करावं. सेवा करणारे आणि उपद्रव करणारे यामध्ये फरक केला पाहिजे. अनेक छोट्या घटनांना मोठे केले जात आहे. गोरक्षण कायद्याच उल्लंघन झाल्यानंतर गैरप्रकार होणार आहे. स्वार्थ भावना बाजूला ठेवून राजकीय पक्षांची वाटचाल झाली पाहिजे.

 केंद्र-राज्यात समन्वय असणे आवश्यक

काश्मीरातील जनतेत विजयाची आणि विश्वासाची भावना निर्माण करण्यासाठी तेथील उपद्रविंना वठणीवर आणावं लागेल आणि त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय असनं गरजेचं आहे, असंही  भागवत यावेळी म्हणाले.

दरम्यान, आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक महत्त्वपूर्ण उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2016 12:46 PM IST

ताज्या बातम्या