S M L

मसूद अझरवर बंदी नको, चीनचं अतिरेक्याला अभय

Sachin Salve | Updated On: Oct 10, 2016 06:40 PM IST

मसूद अझरवर बंदी नको, चीनचं अतिरेक्याला अभय

10 ऑक्टोबर : भारताला अणुपुरवठादार देशांच्या गटात स्थान देणं शक्य नाही, असं चीनने पुन्हा एकदा म्हटलंय. त्यासोबतच जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आणायलाही चीनने विरोध केलाय. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी भारत दौऱ्यावर येतायत. त्याआधीच चीनने ही भूमिका जाहीर केलीय. गोव्यामध्ये होणा•या या परिषदेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.

पठाणकोट आणि उरी हल्ल्याबद्दल भारताने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याच्यावर ठपका ठेवलाय. अल कायदाशी संबंधित असलेल्या अशा दहशतवादी गटांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने काळ्या यादीत टाकावं, अशी भारताची मागणी आहे. पण या मागणीला चीनने दुस•यांदा विरोध केलाय. एप्रिल महिन्यातही मसूद अझरवर बंदी घालू नये, असं एकट्या चीनने म्हटलं होतं. यामुळे चीनचा पाकिस्तानला कसा पाठिंबा आहे हेच पुन्हा दिसून आलंय.

ज्या देशाने अवस्त्र प्रसारबंदीच्या करारावर सही केली नाही त्या देशाला अणुपुरवठादार देशांच्या गटत स्थान देता येणार नाही, या नियमाचा चीनने पुनरुच्चार केलाय. चीनने ही भूमिका बदलावी यासाठी भारत चीनशी चर्चा करेल, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी गेल्या आठवड्यात सांगितलंय. आता शि जिनपिंग यांच्या भारत दौ•यात यावर काही तोडगा निघतो का ते पाहावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2016 06:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close