S M L

सर्जिकल स्ट्राईक झाला, ट्रकमधून दहशतवाद्यांचे मृतदेह नेले ; प्रत्यक्षदर्शींचा दावा

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2016 05:57 PM IST

सर्जिकल स्ट्राईक झाला, ट्रकमधून दहशतवाद्यांचे मृतदेह नेले ; प्रत्यक्षदर्शींचा दावा

05 ऑक्टोबर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा पाकिस्तान वारंवार करतंय. पण आता पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांनीच पाकिस्तानला तोंडघशी पाडलंय. 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय लष्कराने हा सर्जिकल स्ट्राईक केला. त्यावेळी मोठे स्फोट झाले आणि त्यानंतर काही मृतदेह ट्रकमधून नेले आणि ते पुरण्यासाठी नेण्यात आले, असं पाकव्याप्त काश्मीरमधल्या प्रत्यक्षदशीर्ंनीच सांगितलंय.

हा सर्जिकल स्ट्राईक पहाटेच्या पूर्वीच कसा झाला याचा तपशीलच या नागरिकांनी दिलाय. भारतीय लष्कराने नेमके कोणकोणत्या ठिकाणी हल्ले केले हेही त्यांनी सांगितलंय. नियंत्रण रेषेपलीकडे भारतीय पत्रकारांना जाण्याची परवानगी नाही पण पाकिस्तानातल्या पत्रकारांना मात्र सर्जिकल स्ट्राईक झालेल्या काही ठिकाणी नेण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आलीय. परंतु, 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय लष्कराने हा सर्जिकल स्ट्राईक केला. त्यावेळी मोठे स्फोट झाले आणि त्यानंतर काही मृतदेह ट्रकवर टाकून ते पुरण्यासाठी नेण्यात आले, असं पाकव्याप्त काश्मीरमधल्या प्रत्यक्षदशीर्ंनीच सांगितलंय अशी माहिती इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार प्रवीण स्वामी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2016 04:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close