आदेशांचे पालन करा, नाहीतर तसे करण्यास भाग पाडू - सुप्रीम कोर्ट

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2016 03:11 PM IST

Supreme court of india

28 सप्टेंबर :  सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या लोढा समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याबाबत बीसीसीआय टाळाटाळ करत असल्याच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने आज (बुधवारी) ‘बीसीसीआय’ला फटकारलं आहे.

‘बीसीसीआय’ जर स्वत:ला कायद्यापेक्षा मोठं समजत असेल तर ती त्यांची चूक आहे, आदेशांची अंमलबजावणी कशी करून घ्यायची हे कोर्टाला चांगलं माहित आहे. त्यामुळे दिलेल्या आदेशांचे पालन करा, नाहीतर आम्हाला तसे करण्यास भाग पाडावं लागेल, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांनी ‘बीसीसीआय’ला फटकारले. ‘बीसीसीआय’च्या कारभारात सुचवलेल्या सुधाणांसंबंधीचा अहवाल लोढा समितीने आज सुप्रीम कोर्टात सादर केला.

‘बीसीसीआय’ सुचविलेल्या बदलांवर सकारात्मक पद्धतीने काम करत नसल्याचे लोढा समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. याशिवाय ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱयांना पदावरून हटविण्याचेही लोढा समितीने अहवालात म्हटलं आहे. त्याला ‘बीसीसीआय’ने कडाडून विरोध केला आहे.

सुप्रीम कोर्टाने ‘बीसीसीआय’च्या या भूमिकेवर आक्षेप घेत लोढा समितीने सुचविलेल्या बदलांबाबत उत्तर देण्यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. लोढा समितीच्या शिफारशींची पूर्तता करण्याच्या मार्गात बीसीसीआय अडथळा आणत असल्याचेही समितीने अहवालात म्हटलं आहे. लोढा समितीने आज सादर केलेल्या या अहवालामुळे आता बीसीसीआयच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

Loading...

नेमका मुद्दा काय आहे?

- शिफारस : निवड समितीत 3 सदस्य असावेत

- बीसीसीआयनं काय केलं? - 5 सदस्यांची निवड समिती नेमली

- शिफारस : 5 झोनमधून प्रत्येकी एक, हा निकश निवड समितीसाठी असू नये.

- बीसीसीआय : प्रत्येक झोनमधून एक सदस्य नेमला

- शिफारस : वार्षिक सर्वसाधारण सभेत भविष्यातले निर्णय घेऊ नये

- बीसीसीआय : भविष्यासाठी निवड समिती नेमली

- शिफारस - एका राज्याची एकच क्रिकेट संघटना असेल

- बीसीसीआय - तसं अजिबात झालेलं नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रातच तीन संघटना आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2016 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...