7 रेसकोर्स रोडचं नाव एकात्म रोड होण्याची शक्यता

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2016 12:40 PM IST

7 रेसकोर्स रोडचं नाव एकात्म रोड होण्याची शक्यता

 

7crदिल्ली, 21 सप्टेंबर : 7 रेसकोर्स रोड हे पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव प्रसिद्ध आहे. मात्र हे नाव बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे.7 एकात्म मार्ग असं या निवासस्थानाचं नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी नवी दिल्ली नगर परिषदेकडे मागणी केली आहे.

मीनाक्षी लेखी यांनी केलेल्या लेखी मागणीमध्ये पंडित दिन दयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी वर्ष आपण साजरे करत आहोत. आणि भारतीय संस्कृतीला शोभेल असं 7 रेसकोर्स रोड हे नाव योग्य नाही. त्यामुळे ते बदलण्यात यावे अशी मागणी लेखी यांनी केलीये.

मीनाक्षी लेखी या एनडीएमसीच्या सदस्या आहे. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. रेसकोर्स रोड नवी दिल्ली नगर पालिकेच्या अधिकार क्षेत्रात आहे. मीनाक्षी लेखी यांनी 9 सप्टेंबरला लेखी मागणी करुन रेसकोर्स रोडचे नाव 7 एकात्म मार्ग करावे. आतापर्यंत महान व्यक्तींची नावं रस्त्या, चौकांना दिली आहे. 12 जानेवारी 1996 रोजी कनॉट सर्किसचं नाव बदलून इंदिरा चौक आणि कॅनॉट प्लेसचं नाव बदलून राजीव गांधी चौक देण्यात आलंय. तसंच 26 जानेवारी 2002 मध्ये कॅनिंग रोडचं नाव बदलून माधराव सिंधिया मार्ग आणि 28 फेब्रुवारी 2015 ला औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ.एपीजे अब्दुल कलाम रोड दिले गेले आहे अशी आठवणही त्यांनी करुन दिली.

दरम्यान, मीनाक्षी लेखी यांच्या प्रस्तावाला आम आदमी पक्षाचे नेते आणि एनडीएमसीचे सदस्य कमांडर सुरेंद्र सिंह यांनी विरोध केलाय. रेसकोर्स रोडवर पंतप्रधान निवासासह वायु सेनेचं स्टेशन आहे. त्यामुळे नाव बदलायचे असेल तर शहीद सैनिकाचे नाव किंवा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणा•यांचे द्या. आज तुमचे सरकार बहुमताने आले आहे. पण, उद्या दुसरे पंतप्रधान आले तर पुन्हा नाव बदलले जाईल असं सिंह म्हणाले. आज दिल्लीत याबाबत बैठक होणार असून अंतिम निर्णय काय घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2016 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...