आधी दहशतवादाला आळा घाला मग बोला, भारताने पाकला सुनावले

आधी दहशतवादाला आळा घाला मग बोला, भारताने पाकला सुनावले

  • Share this:

sharif-congratulates-modi-on-election-victory-16052014175028721 सप्टेंबर : उरी हल्ल्याचे परिणाम आता संयुक्त राष्ट्रात उमटतायेत. भारत आणि पाकिस्तान मंगळवारी जागतिक समुहासमोर आमनेसामने आले. आधी स्वतःच्या देशातल्या दहशतवाद्यांना आळा घाला, आणि मग आमच्यावर काश्मीरबाबत आरोप करा, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतली. त्याला पाश्चात्य देशांनी पाठिंबाही दिली.

रविवारी काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारताने पाकविरोधात कडक भूमिका घेतलीये. पाकिस्तानाचा खरा चेहरा जगासमोर मांडण्याची रणनिती भारताने आखली आहे. संयुक्त राष्ट्रासमोर पाकचा भारत आणि पाकिस्तान समोरासमोर आले. दहशतवादाला आळा घाला मगच बोला असा खडेबोल भारताने सुनावले. रशिया, जपानपाठोपाठ इतर पाश्चात्य देशांनीही दहशतवादाविरोधात भूमिका घेतल्यामुळे पाक एकटा पडला.त्यामुले पाकला मध्य आशियातल्या मुस्लिम देशांच्या संघटनेकडे जावं लागलं. या संघटनेनं पाकिस्तानची बाजू उचलून धरली. त्यांनी काश्मीरमध्ये मानवविधाकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप भारतावर केला. 26 तारखेला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं तिथे भाषण होणार आहे. तेव्हा भारताची भूमिका आणखी स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 21, 2016, 9:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading