उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा उच्चस्तरीय बैठक

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2016 12:54 PM IST

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा उच्चस्तरीय बैठक

Modi ÃÖÖÖæÝÖ»Öã

19 सप्टेंबर :  श्रीनगरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 20 जवान शहीद झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग, गृह सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव उपस्थित आहेत.कालपासूनची ही सर्वात उच्चस्तरीय बैठक आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, आयबी आणि रॉचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित आहेत. याआधी, आज सकाळी 10च्या सुमारास संरक्षणमंत्री पर्रिकरांनी मोदींची भेट घेतली आणि त्यांना कालच्या घटनेबाबत संपूर्ण माहिती दिली.

दरम्यान, अचानकपणे झालेल्या हल्ल्याला देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांना जशाचतसे उत्तर द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पुढची रणनीती काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2016 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...