उरीच्या हल्लेखोरांना सोडणार नाही!, पंतप्रधानांचा निर्धार

उरीच्या हल्लेखोरांना सोडणार नाही!, पंतप्रधानांचा निर्धार

  • Share this:

pm_modi_in_us

18 सप्टेंबर :  जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. हा हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना धडा शिकवणारच,' असा शब्दच मोदींनी देशाला दिला आहे.

उरीतील हल्ल्यानंतर ट्विटरवरून मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 'उरीतील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मी सलाम करतो. त्यांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे,' असं मोदी यांनी म्हटलं आहे. 'गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. संरक्षणमंत्री स्वत: जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करतील,' असंही ट्विट मोदी यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 18, 2016, 4:01 PM IST

ताज्या बातम्या