कावेरीच्या पाण्यावरून बंगळुरू पेटलं; एकाचा मृत्यू

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2016 12:46 PM IST

कावेरीच्या पाण्यावरून बंगळुरू पेटलं; एकाचा मृत्यू

Karnataka protest

13 सप्टेंबर : कावेरीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडू पुन्हा पेटलं आहेत. बंगळुरूच्या हेगनाहल्ली परिसरात हिंसक झालेल्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक निदर्शक ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. तामिळनाडूला पाणी देण्याचा विरोध करत कर्नाटक आणि तामिळनाडूत सुरू झालेल्या उग्र निदर्शनांनी हिंसक वळण घेतलं. दोन्ही राज्यांमध्ये बस, ट्रक, कारपासून ते हॉटेलांपर्यंत हल्लेही सुरू झाले आहेत. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला आहे.

तर, दुसरीकडे कर्नाटकात म्हैसुरमध्ये असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या घरावरही हिंसक झालेल्या निदर्शकांनी दगडफेक केली.

कावेरी पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू पुन्हा पेटलं आहेत. कर्नाटकमध्ये सोमवारी पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. बंगळूरमधील 16 पोलिस ठाण्यांतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच केपीएन डेपोतील 20 बस पेटवून देण्यात आल्या आहेत.

कावेरीतून तमिळनाडूला 15 ऐवजी 12 हजार क्युसेक पाणी देण्याचा सुधारित आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर कर्नाटक आणि तमिळनाडूमध्येही संघर्षास सुरवात झाली आहे. तमिळनाडूत कन्नड नागरिकांच्या गाड्यांची मोडतोड करण्यात आली असून हॉटेलची नासधूस करण्यात आली. बंगळूरमध्येही याला 'जशास तसे' उत्तर देत तमीळ नागरिकांच्या हॉटेलवर हल्ले झाले. बंगळुरूमध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मेट्रो सेवाही स्थगित करण्यात आली आहे.

Loading...

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. सिद्धरामय्या यांनी आज (मंगळवार) सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2016 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...